* प्रोग्रॅम : एखादे काम करण्यासाठी संगणकाने करायच्या कृतींबद्दल संगणकाला पुरवलेल्या क्रमवार सूचनांच्या ( अज्ञांच्या ) संचाला प्रोग्रॅम म्हणतात.

* अल्गोरिदम : एखादी समस्या सोडवण्यासाठी तर्कशुद्ध पर्यायांच्या मालिकेद्वारे क्रमवार मांडलेल्या मर्यादित सूचनांच्या संचास अल्गोरिदम म्हणतात.

उदाहरण अल्गोरिदम  1 :
मित्राला पत्र पाठवण्याचा अल्गोरिदम
१) एक पोस्टकार्ड घ्या.
२) एक पेन घ्या.
३) पोस्टकार्डवर योग्य मजकूर लिहा.
४) पोस्टकार्डवर मित्राचा पत्ता लिहा.
५) पोस्टकार्ड घेऊन टपालपेटीजवळ जा.
६) टपालपेटीत पत्र टाका.

उदाहरण अल्गोरिदम  2 :
तीन संख्यांची सरासरी काढण्याचा अल्गोरिदम
१) दिलेल्या तीन संख्या वाचा.
२) त्यांची बेरीज करा.
३) त्या बेरजेला ३ ने भागा.
४) आलेले उत्तर लिहा.

* फ्लो-चार्ट : प्रोग्रॅम तयार करण्यासाठी प्रथम अल्गोरिदम लिहावा लागतो. त्यामध्ये संगणकाला द्यायच्या तर्कसंगत सूचना क्रमश: मांडलेल्या असतात. जर अशा अनेक सूचना लिहिलेल्या असतील, तर समजून घेऊन त्यावरून प्रोग्रॅम लिहिणे कठीण होते. म्हणून अल्गोरिदम विशिष्ठ आकृत्यांच्या सहाय्याने मांडतात. त्यालाच फ्लो-चार्ट म्हणतात.


* वापरल्या जाणाऱ्या आकृत्या  :
१) टर्मिनल बॉक्स ( Terminal Box )
गोलाकार आयत 
सुरवात किंवा शेवट दाखवण्यासाठी




२) प्रोसेस बॉक्स ( Process Box ) 
आयत
प्रक्रिया किंवा गणिती क्रिया करण्यासाठी





३) इनपुट/ आउटपुट बॉक्स 
Inpute / Outpute Box ) 
समांतरभुज चौकोन
इनपुट व आउटपुट क्रिया लिहिण्यासाठ



४) डिसिजन बॉक्स (Decision Box) 
समभूज चौकोन
दिलेली अट तपासून निर्णय घेण्यासाठी किंवा तुलना करण्यासाठी



५)  फ्लो-लाईन्स : ॲरो
फ्लोचार्ट मध्ये प्रवाहाची दिशा दर्शवण्यासाठी किंवा आकृत्या जोडण्यासाठी



६) कनेक्टर : 
फ्लोचार्ट चे खंडित भाग जोडण्यासाठी म्हणजेच मोठा फ्लोचार्ट असल्यावर एका पानावर संपून दुसऱ्या पानावर सुरू होतो अशा वेळेस कनेक्टर वापरतात.




उदाहरण फ्लो-चार्ट 1 :

मित्राला पत्र पाठवण्याचा फ्लो-चार्ट








उदाहरण फ्लो-चार्ट 2 :
तीन संख्यांची सरासरी काढण्याचा फ्लो-चार्ट


* प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस :
1) लो लेव्हल लँग्वेजेस : संगणकाला प्रत्यक्ष समजणाऱ्या भाषेला मशीन लँग्वेज म्हणतात. मशीन लँग्वेज मध्ये सर्व प्रोग्रॅम 1 आणि 0 या आकड्यांच्या स्वरूपात लिहिलेले असतात. अशा तऱ्हेची यांत्रिक भाषा संगणकास अज्ञा देण्यासाठी वापरण्यात काही अडचणी येतात व व त्यांचे आकलन, स्मरण व संपादन अवघड होते.

2) हाय लेवल लँग्वेजेस : लो लेव्हल लैंग्वेज च्या वापरामुळे उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रोग्रॅमिंग लँग्वेज चा शोध लावण्यात आला. या भाषा इंग्रजीतील काही शब्द व नियम वापरून तयार केलेल्या असतात. या भाषा युजरला वापरण्यास सुलभ असल्याने त्यांना हाय लेव्हल लैंग्वेज म्हणतात.

हाय लेव्हल लँग्वेज मधील प्रोग्रॅम हे एका विशिष्ट प्रोग्रॅमच्या सहाय्याने लो लेव्हल म्हणजेच मशीन लँग्वेज मध्ये रूपांतरित करावे लागतात. असे प्रोग्रॅम्स कम्पायलर या नावाने ओळखले जातात. बेसिक ही भाषा प्रोग्रॅमिंग ला सुरुवात करणाऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे. यासाठी QBASIC हे कम्पायलर सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरतात.

बेसिक भाषेचे सर्वसामान्य नियम :
१) प्रत्येक विधान / स्टेटमेंट स्वतंत्र ओळीत लिहावे लागते.
२) प्रत्येक ओळीला स्वतंत्र क्रमांक द्यावा लागतो.
३) प्रोग्रॅम मधील सर्वात मोठा (शेवटची) ओळ क्रमांक असलेले विधान END हे असावे.

* डेटा टाइप : कॉन्स्टंट प्रोग्रॅम तयार करताना न बदलणारे राशींची म्हणजेच स्थिर अंकांची आवश्यकता असते त्यांना कॉन्स्टंट म्हणतात.

* व्हेरिएबल्स : प्रोग्रॅम तयार करण्यासाठी सतत बदलणाऱ्या राशींची आवश्यकता असते. त्यांना व्हेरिएबल किंवा चल म्हणतात.

* बेसिक मधील कमांड्स :

* सरावासाठी उदाहरणे :