इंटरनेटची व्याख्या : संपर्क व्यवस्थेचे नियम वापरून, जगभरातील एकमेकांना जोडलेल्या कम्प्युटर्समध्ये माहितीचे आदान-प्रदान करणाऱ्या नेटवर्कच्या महाजालाला “ इंटरनेट ” म्हणतात.

*  इंटरनेटची रचना :
 

*  इंटरनेटचे उपयोग :
१) ई-मेल : डिजिटल स्वरूपातील संदेश
२) गप्पा ( चॅट ) : व्हाट्स अॅप चॅट, व्हिडीओ कॉल
३) ई-कॉमर्स : इंटरनेटवरील जाहिरात, ऑनलाईन शॉपिंग
४) बातम्या : ऑनलाईन बातम्या, हवामान अंदाज
५) इंटरनेट बँकिंग : ऑनलाईन रिचार्ज, मनी ट्रान्सफर, गुगल पे


*  इंटरनेट संबंधित संज्ञांची माहिती :
१) प्रोटोकॉल्स : संगणकांना एकमेकांशी सुसंवाद ( संपर्क ) साधता यावा यासाठी सर्वानुमते निश्चित केलेल्या कार्यपध्दतीच्या नियमांना ‘ प्रोटोकॉल्स ’ म्हणतात.
काही महत्वाची प्रोटोकॉल
इंटरनेट प्रोटोकॉल ( IP )
ट्रान्समिशन प्रोटोकॉल ( TCP )
अॅप्लिकेशन प्रोटोकॉल ( AP )
हायपर टेक्स्ट ट्रान्स्फर प्रोटोकॉल ( HTTP )
फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल ( FTP )


२) वेब होस्टिंग : वेबसाईट तयार करायची असेल तर वेब सर्व्हर वरील जागा वार्षिक शुल्क भरून भाड्याने घेता येते. वेबसाईट साठी एक विशिष्ट नाव ज्याला डोमेन असे म्हणतात त्याचे रजिस्ट्रेशन करावे लागते.


३) वेबसाईट : वेबसर्व्हरवर साठवलेल्या एकमेकांना जोडलेल्या वेबपेजेसच्या संचाला वेबसाईट म्हणतात.


४) वेबपेज : इंटरनेटवरील माहितीच्या एका पानाला वेबपेज म्हणतात.


५) होमपेज : वेबसाईटच्या पहिल्या मुख्य वेबपेजला / पानाला होमपेज म्हणतात.


६) वेब ब्राउझर : इंटरनेट सुविधा वापरण्यासाठी संगणकात आवश्यक असणाऱ्या सॉफ्टवेअरला वेब ब्राउझर म्हणतात. उदा.गुगल क्रोम, मोझीला फायरफॉक्स , इंटरनेट एक्सप्लोरर इ.


७) IP अॅड्रेस : इंटरनेटच्या जाळ्यामधील प्रत्येक कम्प्युटरला एक युनिक पत्ता असतो त्यास IP अॅड्रेस म्हणतात.
उदा. 192.168.10.2


८) काही महत्वाचे डोमेन नेम:


९) सर्च इंजिन : इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या कोट्यावधी वेबसाईट्सम मधून हवी ती माहिती शोधून देणाऱ्या वेबसाईटला सर्च इंजिन म्हणतात.



* ई-मेल : ई-मेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल होय.
ई-मेल अकाऊंट : ई-मेलसाठी ई-मेल सुविधा पुरवणाऱ्या वेबसाईटवर अकाऊंट उघडावे लागते.
ई-मेल अॅड्रेस : ज्या व्यक्तीला ई-मेल पाठवायचा असतो त्याचा ई-मेल अॅड्रेस नीट टाईप करावा लागतो. ई-मेल अॅड्रेस इंग्रजी स्मॉल लिपीत असतो व त्यात स्पेस नसतो.
युजरनेम @ ईमेल चा वेबसाईटचे नाव . डोमेन  
उदा. ajaypatil23@gmail.com


*  काही उपयुक्त वेबसाईट्स :
www.google.com
www.youtube.com
www.wikipedia.com