Download mp3


रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे !!धृ !!

कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ही ठरते आहे

शाहूफुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे
धर्म जातीच्या पार गांधीचे मूल्य मानवी जपतो आहे..

गरीबांसाठी लेणी मोडून लक्ष्मी वाहिनी ठरली आई

कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई
स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे...२

दीन दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया

अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया
शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे..३

जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी

इथे लाभले पंख लेवूनी उंच भरारी नभात घ्यावी
प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगणी चढतो आहे...४

                                        कवी – विठ्ठल वाघ.