* फाईल : कंप्यूटर मधील स्टोरेज डिवाइस वर बायनरी पद्धतीने एकत्रितपणे साठवलेल्या माहितीच्या गटाला फाईल म्हणतात.

फाईल नेम चे प्रकार :
१) प्राइमरी नेम २) एक्सटेन्शन

१) प्रायमरी नेम : हा फाईल नेमच्या सुरूवातीचा भाग असतो. प्रायमरी नेम फाईल तयार करणारा व्यक्ती देतो.

२) एक्सटेन्शन : प्रायमरी नेम नंतर एक्सटेन्शन असते यामध्ये पूर्णविराम असतो. त्यानंतर सामान्यत: तीन अक्षरांनी दर्शवला जातो.




* फोल्डर : आपण कंप्यूटर मध्ये जी माहिती साठवतो ती हार्ड डिस्कवर सेव होते. जास्त क्षमतेच्या हार्ड डिस्कवर मोठमोठे भाग पडलेले असतात त्यांना ड्राईव्ह म्हणतात. हे ड्राईव्ह फोल्डर मध्ये विभागता येतात . फोल्डर म्हणजे हार्ड डिस्कवर माहिती साठवण्याचे छोटे छोटे कप्पे होय.


* फाईल आणि फोल्डर चे व्यवस्थापन -
फाईल आणि फोल्डर चे व्यवस्थापन करण्यासाठी विंडोज मध्ये विंडोज एक्सप्लोरर हा प्रोग्रॅम दिलेला असतो.

१) नवीन फाईल / फोल्डर तयार करणे :-
- ज्या ड्राईव्ह मध्ये फोल्डर तयार करायचा आहे तो ओपन करणे.
- मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक करणे.
- आलेल्या यादीमध्ये New पर्याय निवडणे व व त्यातील New folder वर क्लिक करणे.
- पिवळ्या रंगाचे फोल्डर तयार झालेले दिसते.
- त्याखाली न्यू फोल्डर असे नाव हायलाइट झालेले दिसते ते आपण चेंज करू शकतो

२) फाइल / फोल्डर ला नवीन नाव देणे :-
- जा फाईल किंवा फोल्डर ला नवीन नाव द्यायचे आहे त्यावर राइट क्लिक करा.
- आलेल्या यादीमध्ये Rename या पर्यायावर क्लिक करा.
- अगोदर असलेले नाव हायलाईट झालेले दिसेल. हवे असलेले नवीन नाव टाइप करा.
- इंटर बटन दाबा. बदललेले नवीन नाव दिसू लागेल


३) फाईल / फोल्डर च्या प्रती (Copy) तयार करणे :-
- ज्या फाईल फोल्डर च्या प्रती (Copy) तयार करायच्या असतील त्यावर राइट क्लिक करावी.
- आलेल्या यादीमधून Copy या पर्यायावर क्लिक करावी.
- ज्या ड्राइव्ह किंवा फोल्डर मध्ये प्रत तयार करायची असेल त्यामध्ये राईट क्लिक करावे.
- आलेल्या यादीमध्ये Paste पर्याय निवडावा.
- सिलेक्ट केलेल्या फाईल ची प्रत तयार झालेली दिसेल.

४) फाईल / फोल्डरचे स्थलांतर (Move) करणे :-
- ज्या फाईल फोल्डरचे स्थलांतर (Move) करायचे असेल त्यावर राइट क्लिक करावी.
- आलेल्या यादीमधून Cut या पर्यायावर क्लिक करावी.
- ज्या ड्राइव्ह किंवा फोल्डर मध्ये स्थलांतर करायचे असेल त्यामध्ये राईट क्लिक करावे.
- आलेल्या यादीमध्ये Paste पर्याय निवडावा.
- सिलेक्ट केलेल्या फाईलचे स्थलांतर झालेले दिसेल. 


५) फाईल / फोल्डर Delete करणे :-
- जी फाईल किंवा फोल्डर Delete करायचे आहे त्यावर राइट क्लिक करा.
- आलेल्या यादीमध्ये Delete पर्याय निवडावा.
-ओपन झालेल्या कन्फर्मेशन बॉक्स मध्ये एक संदेश दिसू लागेल.
- डिलीट करायचे असल्यास Yes पर्याय निवडावा. नसल्यास No पर्याय निवडावा.
- Yes पर्याय निवडल्यावर फाईल / फोल्डर डिलीट झालेले दिसेल.

* रिसायकल बिन :
डिलिट केलेले फाइल किंवा फोल्डर रिसायकल बिन मध्ये जाते. रिसायकल बिन मधून डिलिट केलेली फाईल किंवा फोल्डर परत घेता येते. परंतु रिसायकल बिन मधून पुन्हा डिलिट केलेली फाईल किंवा फोल्डर पुन्हा कधीही ही मिळवता येत नाही.

डिलिट केलेले फाइल किंवा फोल्डर परत मिळवणे :-
- रिसायकल बिन ओपन करावे.
- डिलिट केलेली फाईल किंवा फोल्डर शोधावे व त्यावर राइट क्लिक करावी.
- आलेल्या यादीमध्ये Restore हा पर्याय निवडावा.
- डिलिट केलेली फाईल किंवा फोल्डर रिसायकल बिन मधून पूर्वीच्या जागी परत जाते.

* अँटिव्हायरस प्रोग्रॅम :
संगणकामध्ये प्रवेश केलेला व्हायरस काढून टाकण्यासाठी किंवा व्हायरसचा संगणकामध्ये प्रवेश होऊ नये यासाठी जे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असतात त्यांना अँटी-व्हायरस प्रोग्रॅम म्हणतात.
उदा. नेट प्रोटेक्टर, AVG , क्विक हिल,  अव्हास्ट