* संगणकाची मेमरी
* संगणकाच्या मेमरीचे प्रकार
   १) प्रायमरी स्टोअरेज मेमरी 
   २) सेकंडरी स्टोअरेज मेमरी

१) प्रायमरी स्टोअरेज मेमरी
  A) RAM – रँडम अॅक्सेस मेमरी :- हि मेमरी ज्या डेटावर प्रोसेस करीत असते तो डेटा तात्पुरत्या काळासाठी साठवून ठेवते. विद्युतप्रवाह खंडित झाल्यास तो डेटा नष्ट होतो.म्हणून या मेमरीला तात्पुरती मेमरी असेही म्हणतात.

  B) ROM – रीड ओन्ली मेमरी :- या मेमरीमध्ये साठवलेला डेटा कायम स्वरूपी साठवलेला असतो. तो नष्ट करता येत नाही किंवा त्यात बदल करता येत नाही. तो फक्त वाचता येतो. म्हणून या मेमरीला कायम स्मृती मेमरी असेही म्हणतात.


२) सेकंडरी स्टोअरेज मेमरी :- या प्रकारच्या मेमरीमध्ये साठवलेली माहिती संगणकाला पुसून टाकण्याची आज्ञा दिल्याशिवाय ती नष्ट होत नाही किंवा त्यात बदल होत नाही म्हणून या मेमरीला कायम स्वरूपी मेमरी असेही म्हणतात.


   A) नॉन-रिमुव्हेबल मिडिया :- संगणकामध्ये कायमस्वरूपी बसवलेल्या स्टोअरेज मेमरीला नॉन-रिमुव्हेबल मिडिया म्हणतात. उदा. हार्ड डिस्क

  B) रिमुव्हेबल मिडिया :- जी मेमरी संगणकापासून विलग करता येते त्या स्टोअरेज मेमरीला रिमुव्हेबल मिडिया म्हणतात. उदा. CD , DVD , पेन ड्राईव्ह

३) मायक्रोप्रोसेसर :- अति प्रचंड प्रमाणात संघटनात्मक जोडणी करून लक्षावधी ट्रान्झिस्टर्स एका छोट्याशा सिलिकॉन चीपवर एका संपूर्ण सि.पि.यु.चे कार्य करील असे जोडून एक आय.सी. बनवतात. त्याला  मायक्रोप्रोसेसर म्हणतात.


* अत्याधुनिक संपर्क यंत्रणा

    १) मोबाईल एस.एम.एस. (SMS)
SMS - Short Messaging Service
एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर शब्दरूप संदेश पाठवणारी यंत्रणा


    २) मोबाईल एम.एम.एस. (MMS)
MMS – Multimedia Messaging Service
एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर चित्र, ध्वनी व व्हिडीओरूप संदेश पाठवणारी यंत्रणा


३) टेलिकॉन्फरन्स :- टेलीफोनचा वापर करून एकमेकांपासून दूर असलेल्या तीन किंवा अधिक व्यक्तींनी एकमेकांशी केलेले संभाषण म्हणजेच टेलिकॉन्फरन्स होय.


४) व्हिडीओकॉन्फरन्स :- एकमेकांपासून दूर असलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींनी दृक व श्राव्य माध्यमांचा वापर करून एकमेकांशी केलेले संभाषण म्हणजेच व्हिडीओ कॉन्फरन्स होय.
ऑडीओ-व्हिडिओ माध्यमे :
      व्हिडिओ इनपुट - वेबकॅम
      व्हिडिओ आउटपुट - मॉनिटर
      ऑडीओ इनपुट - मायक्रोफोन
      ऑडीओ आउटपुट - स्पीकर