Download mp3

Play Online


छत्रपती शिवाजी महाराज आरती


शिव शंकराचा तू अवतार

हाती घेउनी भवानी तलवार |

नर राक्षसांचा करुणी संहार

              धरणी मातेचा तू केला उद्धार ||  x 2 वेळा

 

जय देव, जय देव, जय शिवराया

आलो तवद्वारी आरती गाया |

जय देव, जय देव, जय शिवराया

           आलो तवद्वारी आरती गाया ||  x 2 वेळा

 

नाथा, अनाथा. तू सामर्थ्य वंत

मावळते बळ केले जीवंत |

राजा, धिराजा, तू होऊनी संत

           जाणता राजा तू योगी श्रीमंत ||  x 2 वेळा

 

जय देव, जय देव, जय शिवराया

आलो तवद्वारी आरती गाया |

जय देव, जय देव, जय शिवराया

             आलो तवद्वारी आरती गाया ||  x 2 वेळा

 

भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी

दुर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि |

शिव तुझे नाम हे संकट हारी

             नीत, विनीत, मी शिवबा शिवारी ||  x 2 वेळा

 

जय देव, जय देव, जय शिवराया

आलो तवद्वारी आरती गाया |

जय देव, जय देव, जय शिवराया

            आलो तवद्वारी आरती गाया ||  x 2 वेळा


शिव शंकराचा तू अवतार

हाती घेउनी भवानी तलवार |

नर राक्षसांचा करुणी संहार

              धरणी मातेचा तू केला उद्धार ||  x 2 वेळा

 

जय देव, जय देव, जय शिवराया

आलो तवद्वारी आरती गाया |.

जय देव, जय देव, जय शिवराया

आलो तवद्वारी आरती गाया ||..

जय देव, जय देव, जय शिवराया

आलो तवद्वारी आरती गाया |||...

 

प्रौढ प्रताप पुरंदर , क्षत्रियकुलावतंस ,

सिंहासनाधिश्वर, राजा धीराज,

श्री श्री श्री शिवछत्रपती

शिवाजी महाराज की जय...


- दत्ता सोनवणे-देशमुख

- गायक : आदर्श शिंदे