बर्याचदा फॉर्म भरण्यासाठी स्कॅन केलेल्या फोटो ची साईज कमी करून घ्यावी लागते...

१) Size कमी करावयाचे असलेले फोटो select करावे व त्यावर right click करावी व “Sent to” “Mail Recipient” निवडावे.



२) त्यानंतर खालीलप्रमाणे हवी असलेली size सिलेक्ट करून Attach वर click करावे .



३)  त्यानंतर खालीलप्रमाणे Message आल्यावर OK करू नये व Close पण करू नये.


४)  त्यानंतर Start मेनू मधे %temp% सर्च करावे व temp नावाचे फोल्डर ओपन करावे.


५) temp फोल्डर मध्ये size कमी झालेल्या images शोधून त्या Move / Copy करून घ्याव्या.